भटिंडात क्षेपणास्त्राचे भाग सापडले   

चंडीगढ : पंजाबमधील भटिंडा येथे क्षेपणास्त्राचा एक भाग सापडला होता. ते चिनी बनावटीचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घेरी बागी गावात गुरुवारी स्फोट झाला होता. त्या ठिकाणी ते क्षेपणास्त्र सापडले असल्याचे सरपंच जोगींदर सिंग यांनी दिली. ग्रामस्थांनी त्याला हात लावला नाही. नागरी आणि लष्कर विभागाने ते ताब्यात घेतले आहे. क्षेपणास्त्राचा भाग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, पंजाबमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंडीगढमधील शाळा देखील दोन दिवस बंद राहतील. अमृतसर आणि सीमावर्ती शहरात अजानला ९ ते १४ मे दरम्यान प्रतिबंध असेल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

जैसलमेरमध्ये बाँबसदृश्य वस्तू सापडली

राजस्तानच्या जैसलमेरच्या किशनघाट परिसरात बाँबसदृश्य वस्तू शुक्रवारी सकाळी सापडली. यानंतर पोलिस आणि हवाई दलाने धाव घेतली आणि परिसर निर्मनुष्य करण्यात आला. जोगीच्या यांच्या कॉलनीतील एका नर्सरीजवळ ती सापडली होती. वस्तूची लष्कराच्या तज्ज्ञांकडून तपासणी करुन जप्त केली जाणार आहे.

Related Articles